अथेन्सहून परतून एक आठवडा ओलांडला तरी अजून काही ग्रीस व टर्कीची जादू काही कमी होत नाही. असे वाटत आहे की मन अजूनही तिथेच तरंगत आहे, कॅपाडोकियाच्या गुहा, एजियनचे ते अथांग निळेशार पाणी अजूनही डोळ्यासमोरुन जात नाही आहे. सकाळी उठताना अजूनही ट्रिपच्याच आठवणी येत रहातात. खरेतर एक साधी ट्रिप प्लॅन केली होती. मी माझ्या डिपार्टमेंटमधील मित्रांबरोबर ग्रीसला जायचे ठरवले होते. जर बायको आल्यास ती पण. सरांना ही कल्पना सांगितल्यावर तेही तयार, पुरातत्व संशोधक म्हणून ग्रीसमधील पुरातन जागा पहायचे त्यांचाही मनसुबा केव्हापासून तयार होता. परंतु एक अडचण होती ती म्हणजे मी व माझे मित्र आम्ही ग्रीसचे बीचेस, पार्टीज प्लॅन करत होतो व ही कल्पना एकदम वेगळीच ग्रीस की एका पुरातत्व संशोधकाच्या दृष्टीतून पहायचे. हा अनुभव मला मिस नव्हता करायचा म्हणून सरांबरोबर वेगळे ग्रीसला जायचे व मित्रांबरोबर वेगळे जायचे ठरवले.
मे महिन्याच्या सुरुवातीला एकदम हालचालींना वेग आला. दिपाला सरांनी सर्व आयोजित करण्यास सांगितले. कॉक्स अँड किंग्स, केसरी अश्या विविध टूर ऑपरेटर्स बघितले, ग्रीस आणि टर्की हे काही बाकी युरोपीय देशांसारखे अजूनही भारतात पर्यटनाला प्रसिद्ध नाहीत त्यामुळे टूर आयोजित करण्यात बर्याच अडचणी होत्या, परंतु कॉक्स अँड किग्स वाल्यांनी आम्हाला आम्हाला पाहिजे तशी टेलरमेड टूर करुन देउ याची ग्वाही दिली. मला इथून व्हिजा साठी काही अडचण नव्हती परंतु भारतात मात्र वेळ लागला. तरी मला टर्कीचा व्हिजा काढावा लागला. त्यासाठी कॉक्स अँड किग्स वाल्यांनी जरुर ती कागदपत्रे दिली. सुरुवातीला टर्की व नंतर ग्रीस असा कार्यक्रम ठरला तरी बजेट मध्ये देखील आणायचे होते त्यामुळे अनेक महत्त्वाच्या ठिकाणी काट छाट मारावी लागली. टर्की मधील ट्रॉय, इस्तंबूल- अथेन्स मध्ये अजून एखादा ज्यादा दिवस, ग्रीस मध्ये ऑलिंपीया शहर हि ठिकाणे रद्द करण्यात आली. सुरुवातीला मी थोडा हिरमुसलो. पण असोत, दिपाने तेवढा कार्यक्रम देखील छान अरेंज केला होता व ट्रिपनंतर हेही नसे थोडके हाच प्रत्यय आला.
पुण्यावरुन जवळपास ९ जण येणार होते. मी इथून डायरेक्टली स्टुट्गार्टवरुन इस्तंबूल ला गेलो. मध्यरात्री पोहोचल्यावर इस्तंबूलच्या टॅक्सी वाल्यांचा चांगलाच अनुभव घेतला व पुण्याचे रिक्षावाले काय की इस्तांबूलचे टॅक्सी ड्रायव्हर काय सगळ्यांची जात एकच हा प्रत्यय आला. नियोजित हॉटेलवर वेळे आगोदरच पोहोचल्याने ३-४ तास लॉबी मध्ये काढावे लागले. पण तिथेपण चांगली झोप झाली. मग नंतर रुम मध्ये जाउन बाकिच्यांची वाट पहात बसलो. ह्या सर्वांचे विमान जवळपास ३ तास उशीराने आले. तो पर्यंत मी मस्त पैकी चहा नाश्ता करुन बसलो होतो. इस्तंबूल च्या ह्या जुन्या भागात रस्त्यावर गाद्या टाकून रेस्टॉरंट तयार करतात. सुरुवातीला थोडे विचित्र वाटले परंतु नंतर गर्दीच्या वेळेस गोरे लोक गाद्यांवर बसून रस्त्याच्या कडेला कुणाचीही पर्वा न करता जेवत होते. पहावे ते नवीनच, हेच का ते स्टायलिश गोरे लोक हा प्रश्ण पडतो.
मे महिन्याच्या सुरुवातीला एकदम हालचालींना वेग आला. दिपाला सरांनी सर्व आयोजित करण्यास सांगितले. कॉक्स अँड किंग्स, केसरी अश्या विविध टूर ऑपरेटर्स बघितले, ग्रीस आणि टर्की हे काही बाकी युरोपीय देशांसारखे अजूनही भारतात पर्यटनाला प्रसिद्ध नाहीत त्यामुळे टूर आयोजित करण्यात बर्याच अडचणी होत्या, परंतु कॉक्स अँड किग्स वाल्यांनी आम्हाला आम्हाला पाहिजे तशी टेलरमेड टूर करुन देउ याची ग्वाही दिली. मला इथून व्हिजा साठी काही अडचण नव्हती परंतु भारतात मात्र वेळ लागला. तरी मला टर्कीचा व्हिजा काढावा लागला. त्यासाठी कॉक्स अँड किग्स वाल्यांनी जरुर ती कागदपत्रे दिली. सुरुवातीला टर्की व नंतर ग्रीस असा कार्यक्रम ठरला तरी बजेट मध्ये देखील आणायचे होते त्यामुळे अनेक महत्त्वाच्या ठिकाणी काट छाट मारावी लागली. टर्की मधील ट्रॉय, इस्तंबूल- अथेन्स मध्ये अजून एखादा ज्यादा दिवस, ग्रीस मध्ये ऑलिंपीया शहर हि ठिकाणे रद्द करण्यात आली. सुरुवातीला मी थोडा हिरमुसलो. पण असोत, दिपाने तेवढा कार्यक्रम देखील छान अरेंज केला होता व ट्रिपनंतर हेही नसे थोडके हाच प्रत्यय आला.

हे सर्वजण आल्यानंतर पहिले भेटलो, बायकोला ६ -७ महिन्यांनंतर पहात होतो. लगेचच आम्ही आवरुन अय्या सोफियाला प्रयाण केले व आमची ग्रीस टर्कीची ट्रिप चालू झाली. गाईड एकदम छमिया होती, अय्या सोफिया पाशी पोहोचल्यावर त्याच्या भव्यतेची चूणूक मिळाली व आत गेल्यावर ही इमारत किती जुनी असेल याचा अंदाज आला. अय्या सोफिया ही जगातल्या प्राचीन इमारतींपैकी एक आहे. ही इमारत अजूनही शाबूत आहे. साधारणपणे ६व्या शतकात बायझंटाईन सम्राटांनी याची निर्मिती केली. पहिल्या दोन प्रयत्नात त्याचे घुमट कोसळले व पुन्हा बांधली. याचा प्रामुख्याने चर्च म्हणून वापर होत होता. कॉन्स्टंटिनोपल च्या पाडावानंतर सुलतान मोहम्मद याने पहिले या चर्च मध्ये पाय टाकून ही आजपासून मशीद आहे अशी घोषणा केली. त्यानंतर याचा वापर मशीद म्हणून होत होता. परंतु ख्रिस्ती लोकांच्या भावना याच्याशी निगडीत होत्या. आजही आतमधून फिरताना चर्चचाच भास होतो. त्यामुळेच कदाचित याचा मशीद म्हणून वापर बंद झाला असावा. नंतर ऑटोमन सम्राटांनी निळ्या मशीदीची निर्मिती केली. अय्या सोफियात आतमध्ये गेल्यावर छान वाटते. बायझंटाईन साम्राज्याच्या भव्यतेची जाणीव होते. बायझंटाईन साम्राज्य म्हणजे रोमन साम्राज्याचाच भाग एका रोमन सम्राटाला आपले राज्य दोन्ही मुलांना सम्राट म्हणून पहायचे होते म्हणून रोमन साम्राज्याचे पूर्व व पश्चिम असे दोन भाग केले पूर्वेकडचा भाग बायझंटाईन म्हणून ओळखला गेला. पश्चिम रोमन साम्राज्य लवकर लयाला गेले परंतु ग्रीक अधिपत्याखालील या साम्राज्याने जवळपास १२०० वर्षे आसपासच्या प्रदेशावर राज्य केले.
अय्यासोफिया समोरच निळी मशीद आहे व दोघांच्या मध्ये प्राचीन कालीन स्तंभ आहेत, एक स्तंभावर इजिप्शीयन कोरीव काम दिसते, दुसरा सर्प स्तंभ आहे तर तिसरा दगडी स्तंभ आहे, दगडी स्तंभ असे मानतात की २ ते अडिच हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे, गाईडने या स्तंभांची माहीती सांगता सांगता इतिहासात नेले समोर लगेचच निळ्या मशीदीत प्रवेश केला, मशीदीत जाताना साखळीखालून जावे लागते म्हणे ही साखळी सुलतानासाठी होती, त्याला नेहेमी आठवण करुन द्यायला की त्याच्यापेक्षाही महान कोणीतरी ( अल्लाह) आहे.
निळ्या मशीदीचा मात्र मशीद म्हणून वापर होतो. १६ व्या शतकात या मशीदीची निर्मिती झाली ऑटोमन साम्राज्याचा महान सुलतान सुलेमान ने याची निर्मिती करवली. आतल्या निळ्या रंगाच्या फरश्यांमुळे याला निळी मशीद असे म्हणतात. नमाजाची वेळ असल्याने आम्हाला थांबावे लागले. तोवर जवळचा बाझार बघून आलो. बायकांना खरेदीचा मोह न झाल्यास आश्चर्य परंतु किमती ऐकून मोह विरत होता. निळ्या मशीदीत आत गेल्यावर पहिले लक्षात येते तो येथील घुमट व प्रचंड मोठाले खांब. अजूनही काही जणांचे नमाज चालू होते. तुर्कस्तानात ९० टक्यांपेक्षाही जास्ती इस्लाम धर्मिय आहेत परंतु इस्तंबूल मध्ये मात्र धर्माचा पगडा फारसा जाणवत नाही. या मशीदीत आल्यानंतरच जाणवते की लोक इस्लाम धर्मिय आहेत म्हणून. तुर्कस्तान हा बहुसंख्य इस्लामी असूनही मोजक्या धर्मनिरपेक्ष देशांमध्ये मोडतो व त्याचा प्रत्यय आम्हाला इस्तंबूल मध्ये आला. निळ्या मशीदीनंतर आमची इस्तंबूलच्या प्रसिद्ध बॉस्फर खाडी मध्ये बोट सफर होती. हा एक इस्तंबूल मधील अविस्मरणीय अनुभव आहे, बॉस्फरच्या खाडीच्या कडेकडेने इस्तंबूल मधील अनेक महत्त्वाच्या जागा पहावयास मिळाल्या, मोहम्मद ने कॉन्स्टंटिनोपलच्या पाडावासाठी बांधलेला किल्ला ही पहावयास मिळतो तसेच दोन खंडांना पूल डोळ्याचे पारणे फेडतात. बॉस्फर खाडीच्या लगतच तुर्कस्तानातील अतिश्रीमंताचे अत्यंत सुंदर बांधलेले बंगले आहेत, एकाला लागून एक अश्या ह्या बंगल्यांना प्रवेशद्वार हे खाडीतूनच असते व जायचे झाल्यास बोटीतूनच जावे लागते. वाटेतच सुलतानाचा १९ व्या शतकातील युरोपीय शैलीतील राजवाडाही पहावयास मिळाला.
यानंतर काही काळ हॉटेल वर विश्रांती होती, व नंतर इस्तंबूल मधील एका सर्वोत्तम अश्या रेस्तॉरंट मध्ये जेवण होते. जेवण नव्हे तर पर्वणीच म्हणावी लागेल. बाहेरून राजवाड्याप्रमाणे दिसणार्या या रेस्तॉरंत मध्ये सेंटर स्टेज होता व त्याच्या आजूबाजूला जेवणाची टेबले सजवली होती। हे खास बेली डान्सचे रेस्तॉरंट होते. दिपाने दिलेल्या माहितीनुसार आम्हाला प्रत्येकी याची फी ८० युरो इतकी पडली. महाग होते परंतु असा अनुभव रोज येत नाही. नृत्य सुरु झाले तसेच आमचे व्हेजी जेवणही टेबलवर अवतरले. सुरुवातील साधे तुर्की स्थानिक नृत्ये होती. तीही छान मोहक होती. यानंतर मात्र ती बेली डान्सची मदनिका अवतरली, झिरमिळ्यांच्या कपड्यात परफेक्ट फिगरच्या त्या नृतीका म्हणजे मदनिकेचा अवतारच होता. अत्यंत तालबद्ध संगीतावर तिचे नृत्य सुरू झाले व जेवणाचा आस्वाद सोडून तिच्या नृत्याचा आस्वाद घेण्याचे ठरवले. ८० युरो वसूल. भारतीय क्लासिक नृत्याऐवढी सात्त्विक नसली तरी बेली डान्स बद्दल ऐकलेली बिभत्सता कुठेही या नृत्यात नव्हती, होते ते फक्त निखल मनोरंजन. अत्यंत सुरेख पदलालित्यावर पोटाचे कमरेच्या छातीच्या हालचाली म्युझिकच्या ठेक्यावर अत्यंत लयबद्द रितीने करत होती. मन एकदम प्रफुल्लित झाले.
यापुढील नृतीका अजूनच सौदर्यवती होती. डोक्यावर मेणबत्यांची थाळी नाचवत केलेल्या नृत्याने डोळ्याचे पारणे फेडले. हिची फिगर अजूनच सही होती. नेकांना हिचे नृत्य पहिलीच्या पेक्षा भारी वाटले परंतु मला सुरुवातीला ठिक ठाक नेहेमीसारखे वाटले. परंतु जसजसे ठेका धरत गेला तस तसा तिचा करिश्मा कळू लागला. तिने हातात रेशमी झेंडे घेउन केलेला नाच जबरी होता व सरते शेवटी म्युझिकच्या ठेक्यावर केलेल्या नृत्याने हाईट केली, अजूनही त्या स्टेपस् माझ्या डोळ्यापुढे नाचत आहेत व इट्स् माय फेव्हरेट. सर्वात मस्त म्हणजे माझ्या कॅमेराने हे सर्व टिपले व नुकत्याच घेतलेल्या माझ्या कॅमेराचे पूर्ण पैसे वसूल. आम्ही अजून थांबू शकलो असतो परंतु सकाळी ५ वाजता उठून अंकाराला जायचे असल्याने तिथून लवकर निघालो.
निळ्या मशीदीचा मात्र मशीद म्हणून वापर होतो. १६ व्या शतकात या मशीदीची निर्मिती झाली ऑटोमन साम्राज्याचा महान सुलतान सुलेमान ने याची निर्मिती करवली. आतल्या निळ्या रंगाच्या फरश्यांमुळे याला निळी मशीद असे म्हणतात. नमाजाची वेळ असल्याने आम्हाला थांबावे लागले. तोवर जवळचा बाझार बघून आलो. बायकांना खरेदीचा मोह न झाल्यास आश्चर्य परंतु किमती ऐकून मोह विरत होता. निळ्या मशीदीत आत गेल्यावर पहिले लक्षात येते तो येथील घुमट व प्रचंड मोठाले खांब. अजूनही काही जणांचे नमाज चालू होते. तुर्कस्तानात ९० टक्यांपेक्षाही जास्ती इस्लाम धर्मिय आहेत परंतु इस्तंबूल मध्ये मात्र धर्माचा पगडा फारसा जाणवत नाही. या मशीदीत आल्यानंतरच जाणवते की लोक इस्लाम धर्मिय आहेत म्हणून. तुर्कस्तान हा बहुसंख्य इस्लामी असूनही मोजक्या धर्मनिरपेक्ष देशांमध्ये मोडतो व त्याचा प्रत्यय आम्हाला इस्तंबूल मध्ये आला. निळ्या मशीदीनंतर आमची इस्तंबूलच्या प्रसिद्ध बॉस्फर खाडी मध्ये बोट सफर होती. हा एक इस्तंबूल मधील अविस्मरणीय अनुभव आहे, बॉस्फरच्या खाडीच्या कडेकडेने इस्तंबूल मधील अनेक महत्त्वाच्या जागा पहावयास मिळाल्या, मोहम्मद ने कॉन्स्टंटिनोपलच्या पाडावासाठी बांधलेला किल्ला ही पहावयास मिळतो तसेच दोन खंडांना पूल डोळ्याचे पारणे फेडतात. बॉस्फर खाडीच्या लगतच तुर्कस्तानातील अतिश्रीमंताचे अत्यंत सुंदर बांधलेले बंगले आहेत, एकाला लागून एक अश्या ह्या बंगल्यांना प्रवेशद्वार हे खाडीतूनच असते व जायचे झाल्यास बोटीतूनच जावे लागते. वाटेतच सुलतानाचा १९ व्या शतकातील युरोपीय शैलीतील राजवाडाही पहावयास मिळाला.

यापुढील नृतीका अजूनच सौदर्यवती होती. डोक्यावर मेणबत्यांची थाळी नाचवत केलेल्या नृत्याने डोळ्याचे पारणे फेडले. हिची फिगर अजूनच सही होती. नेकांना हिचे नृत्य पहिलीच्या पेक्षा भारी वाटले परंतु मला सुरुवातीला ठिक ठाक नेहेमीसारखे वाटले. परंतु जसजसे ठेका धरत गेला तस तसा तिचा करिश्मा कळू लागला. तिने हातात रेशमी झेंडे घेउन केलेला नाच जबरी होता व सरते शेवटी म्युझिकच्या ठेक्यावर केलेल्या नृत्याने हाईट केली, अजूनही त्या स्टेपस् माझ्या डोळ्यापुढे नाचत आहेत व इट्स् माय फेव्हरेट. सर्वात मस्त म्हणजे माझ्या कॅमेराने हे सर्व टिपले व नुकत्याच घेतलेल्या माझ्या कॅमेराचे पूर्ण पैसे वसूल. आम्ही अजून थांबू शकलो असतो परंतु सकाळी ५ वाजता उठून अंकाराला जायचे असल्याने तिथून लवकर निघालो.
Keine Kommentare:
Kommentar veröffentlichen